आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेट परीक्षेचा निकाल जाहीर; टक्केवारी 6.52; चार हजार ६८ उमेदवार उत्तीर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून, या परीक्षेत चार हजार ६८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही राज्यांत मिळून एकूण ६२ हजार ४०४ उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी चार हजार ६८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्केवारी    केवळ ६.५२ इतकी आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी दिली.

 

ज्या उमेदवारांचे पदव्युत्तर पदवीचे निकाल अद्याप लागलेले नाहीत, त्यांची ई - प्रमाणपत्रे निकाल जाहीर झाल्यावर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मिळतील. इतर उत्तीर्ण उमेदवारांनी ई प्रमाणपत्रासाठी विहीत नमुन्यानुसार ऑनलाईन पद्धतीने सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केवळ एक महिन्याच्या अवधीत करणे बंधनकारक आहे, असेही डॉ. शाळिग्राम यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...