आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले पगडीचा स्वीकार म्हणजे वैयक्तिक किंवा कोणत्या वर्गाच्या विरोधात मत मांडणे नव्हे : शरद पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत शरद पवार यांनी यापुढे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात फुले पगडीच घातली जाईल असे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियात टीकेची झोड उठली होती. यावर पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले फुले पगडीचा स्वीकार म्हणजे वैयक्तिक किंवा कोणत्या वर्गाच्या विरोधात मत मांडणे असे नव्हते. पुण्यावर टीका असा काही अर्थ नाही. उलट मी पुण्यात शिकलोय. पुण्याचा मला अभिमान आहे.

 

पवार पुणे महापालिकेच्या डॉ कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, मी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे आदर्श मानतो. छत्रपती एकच असतो म्हणून त्यांची पगडी, टोपी सर्वसामान्य नागरिकांनी घालायच्या नसतात. डॉ आंबेडकर हे कधी टोपी किंवा पगडी घालत नव्हते. म्हणून ज्योतिबा फुलें यांचे आतापर्यंतचं कार्य पाहता मी त्यासाठी पुरस्कार केला आणि पगडीचा मी उल्लेख केला.  

बातम्या आणखी आहेत...