आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: सासवडमध्ये शरद युवा महोत्सवाला सुरूवात,अभिनेते गिरीश कुलकर्णीची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासवडमध्ये शरद युवा महोत्सवाचे आज उद्धघाटन झाले. - Divya Marathi
सासवडमध्ये शरद युवा महोत्सवाचे आज उद्धघाटन झाले.

पुणे- पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शरद युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी झाले. सासवडमध्ये आयोजित केलेल्या या युवा महोत्सवाला पाच हजाराहून अधिक तरूण-तरूणींनी उपस्थिती लावली आहे. गुरूवार आणि शुक्रवारी (14 आणि 15 डिसेंबर) या दोन चालणा-या युवा महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

 

गुणवंत तरूण- तरूणांच्या कलागुणांना भरारी मिळावी त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन स्वत:ची ओळख निर्माण करावी या उद्देशाने ‘पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘शरद युवा महोत्सव–२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होणार आहे. भोर, वेल्हा, मुळशी, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील तीन हजारहून अधिक स्पर्धक युवा सहभागी झालेले आहेत.

 

14 डिसेंबर रोजी वैयक्तिक गायन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धा होणार असून 15 डिसेंबर रोजी वैयक्तिक नृत्य स्पर्धा, ढोल ताशा स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, वत्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुपट निर्मिती स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्यातील प्रतिभा एकमेकांच्या, साथीने जगाला दाखवून स्वत:ला सिध्द करावे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...