आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरीष कुलकर्णी यांचा जामीन हायकोर्टाने फेटाळला; पोलिसांना शरण जाण्याचा आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/ दिल्ली-  बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांनी केलेला अटकपूर्व जामिन आज (सोमवार) फेटाळला. याआधी त्यांचा जामिन अर्ज पुणे न्यायालय तसचे मुंबई उच्च न्यायालयानेदेखीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पोलिसांसमोर शरण येण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिली आहे. 

 

मुंबई उच्च न्यायालयाने शिरीष यांचा अटकपूर्व जामिन फेटाळताना 18 जून पर्यंत तपास अधिका-यांसमोर हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. फेब्रुवारी महिन्यापासून शिरीषला अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आर्थिक फसवणुकीप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीला आधीच अटक करण्यात आली आहे. 

 

गुंतवणूकदारांची २०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यात शिरीषही आरोपी असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. आपण डीएसकेच्या अन्य कंपन्यांमध्ये संचालक असल्याने गैरव्यवहाराच्या आरोपांशी आपला संबंध नाही, असा युक्तिवाद शिरीष यांच्यातर्फे अर्जात करण्यात आला होता. मात्र, 'डीएसके हा एकच ब्रँड आहे आणि त्याअंतर्गत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये पैशांची जी देवाणघेवाण झालेली असेल त्याच्यापासून तुम्ही फारकत घेऊ शकत नाही. त्यामुळे या अर्जावरून आम्ही अटकेपासून संरक्षण देऊ शकत नाही असे कोर्टाने यापूर्वी नमूद केले होते. तसेच पोलिसांना कधीपर्यंत शरण जाणार ते सांगा, अशी विचारणाही न्यायमूर्तींनी केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...