आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी विकायची सिमकार्ड, आता International Beauty काँटेस्टमध्‍ये करणार आशियाचे प्रतिनिधीत्‍व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्‍याची श्रद्धा कक्‍कड जमैका येथे 21 जुलै रोजी होणा-या 'मिसेस युनायटेड नेशन' स्‍पर्धेत आशियाचे प्रतिनिधीत्‍व करणार आहे. 2017 मध्‍ये तिने 'मिसेस आशिया यूनायटेड नेशन' हा किताब आपल्‍या नावावर केला होता. एक यशस्‍वी इंटेरिअर डिझाईनर असलेल्‍या श्रद्धाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. 

 

अभ्‍यासाचा खर्च भागवण्‍यासाठी विकले सिमकार्ड 
नाशिकच्‍या एका श्रीमंत व्‍यवसायिक कुटुंबात श्रद्धाचा जन्‍म झाला. तिचे शालेय शिक्षणही इथेच पुर्ण झाले. वडील मोहन कसार यांची एक यशस्‍वी उद्योजक म्‍हणून सर्वत्र ओळख होती. त्‍यामुळे सुरूवातीला त्‍यांना पैशाची कोणतीही चणचण भासली नाही. मात्र काही काळानंतर वडीलांचा व्‍यवसाय पुर्ण बुडाला. इतका की, श्रद्धाच्‍या शालेय शिक्षणासाठीही त्‍यांच्‍याकडे पैसे नव्‍हते. तेव्‍हा श्रद्धा केवळ 16 वर्षांची होती. या अडचणीच्‍या काळात आपला शाळेचा खर्च भागवण्‍यासाठी व कुटुंबीयांना मदत करण्‍यासाठी तिने नाशिकमध्‍ये सिमकार्ड विकण्‍याचे काम केले होते.  

 

दिवसा अभ्‍यास, संध्‍याकाळी बँकेत केले काम 
- श्रद्धाने सांगितले की, कुटुंबाच्‍या हलाखीच्‍या परिस्थितीमध्‍ये माझ्या शिक्षणाचा खर्च मीच उचलण्‍याचे ठरवले होते. त्‍यामुळे पुण्‍यात सिंहकड इन्सिट्युटमध्‍ये इंटेरिअर डिझायनिंगच्‍या कोर्सला प्रवेश घेतल्‍यानंतर मी दिवसा अभ्‍यास तर संध्‍याकाळी आयसीआयसीआय बँकेत लोन विभागत काम करायचे. तेव्‍हा पैसे फार कमी मिळायचे. कसाबसा मला आपला खर्च भागवावा लागत असे. 

 

फॅशन इंडस्‍ट्रीमध्‍ये अशी आली श्रद्धा 
- पुण्‍यात अभ्‍यास करताना श्रद्धाने 2005मध्‍ये 'मिस पुणे' या स्‍पर्धेत भाग घेतला होता. त्‍यमध्‍ये ती फर्स्‍ट रनरअप होती. यानंतर तिला मॉडेलिंगचे छोटछोटे काम आणि सिनेमांच्‍या ऑफर येऊ लागल्‍या. 

 

एका मुलाची आई आहे श्रद्धा 
- शिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर कॉमर्स ग्रॅज्‍युएट श्रद्धाने इंटेरिअर डिझायनिंगची स्‍वत:ची कंपनी सुरू केली. यामध्‍ये तिला चांगलेच यश मिळाले. याचदरम्‍यान तिची ओळख पुण्‍याचे व्‍यवसायिक देवन कक्‍कड यांच्‍याशी झाली. दोघांनी 2011 मध्‍ये विवाह केला. त्‍यांना आता एक मुलगाही आहे. तो जवळपास साडेतीन वर्षांचा आहे. श्रद्धाने सांगितले की, कुटुंबाच्‍या पाठिंब्‍यामुळेच मी अजूनही फॅशन जगतात काम करत आहे. 

 

सामाजिक कार्यातही सहभाग 
श्रद्धाचा सामाजिक कार्यातही स‍क्रीय सहभाग आहे. पुण्‍यातील अनाथालय आणि वृद्धाश्रमांमध्‍ये ती अनेकदा वेळ घालवते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...