आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- शुभम शिर्के या पंधरावर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी अमित नायरला पुणे कोर्टाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आर. एन. सरदेसाई यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला अशी माहिती निकम यांनी दिली. शुभमचे सहा वर्षांपूर्वी त्याच्याच मित्राने आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीन त्याचे अपहरण केले होते व 50000 रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी दिल्यानंतरही त्याची हत्या केली होती. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
एप्रिल 2012 मध्ये अमित नायर (वय 19) व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी शुभमचा गळा आवळून व चाकू भोसकून खून केला होता ‘‘दूरचित्रवाणीवरील ‘सीआयडी’ मालिका पाहून मारेक-यांनी अत्यंत थंडपणे, नियोजनपूर्वक आमच्या शुभमची केली. अल्पवयीन असल्याच्या कारणाखाली या दोन मारेक-यांना मोकळे सोडू नये. त्यांना फासावरच लटकवावे,’ अशी मागणी शुभमच्या माता-पित्यांनी केली होती. शुभमचे वडील महादेव व आई सुनीता यांनी तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. तसेच पोलिसांवर बेफिकरीचा आरोप केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.