आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके ग्रुपमध्ये अडकलेले पैसे मिळण्यासाठी सह्यांची मोहीम, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गुंतवणुकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे मात्र अद्यापही हजारो गुंतवणुकदारांना डीएसके ग्रुपकडून पैसे मिळाले नाहीत. डीएसके ग्रुपमध्ये हजारो गुंतवणुकदारांचे पैसे गुंतल्याने त्यांनी पुण्यातील चिंतरंजन वाटिका येथे एकत्र येत सह्यांची मोहीम सुरू केली. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना करावी, आदी मागण्या या मोहिमेतून गुंतवणुकदारांनी केल्या आहेत.

 

पोलीस आयुक्त, कोर्टालाही लिहिले पत्र
फसवणुकीमुळे हतबल झालेल्या गुंतवणुकदारांनी डीएसकेंच्या विविध जागा विकण्यास परवानगी देणारे सुचनापत्र तयार करावे, अशी निवदेनातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. या मागणीवर अनेक गुंतवणुकदारांनी सह्या केल्या आहेत. त्याचबरोबर गुंतवणुकदारांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पोलीस आयुक्त, न्यायालय यांनाही पत्र लिहिले आहे.  रिझर्व्ह बँकेने तारण असलेल्या डीएसकेंच्या मालमत्तेची शहानिशा करून जाहीर लिलाव करावा, अशी मागणी केल्याचे गुंतवणुकदार वैशाली कुलकर्णी यांनी सांगितले. शहानिशा न करता डीएसकेंना कर्जे दिली आहेत, अशा बँकावर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून केल्याचे योगेश पाटणकर यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...