आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाला नकार देत तरुणीने सोडले घर, बहिणीनेही बोहल्यावर चढण्यास नकार देत केले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरीतील भोसरी परिसरातील एका 20 वर्षीय तरुणीने आपल्यापेक्षा वयाने 14 वर्षे मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अनिच्छेमुळे तसेच शिक्षण पूर्ण करायचे असल्याने घरच्यांचा विरोध डावलून घर सोडले. तरुणीचे लग्न एक आठवड्यावर आल्याने तिने घर सोडल्याने घरच्यांवर नामुष्की ओढावली. त्यांनी तिच्या जागी तिच्या छोट्या बहिणीला बोहल्यावर चढवण्याचा प्रयत्न केला पण तिनेही घरच्यांना विरोध करत घराबाहेर पसंत केले. मोठ्या बहिणीने भोसरी पोलिसांना ही हकीकत पत्र लिहून कळवली आहे. 


भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या अखत्यारित असलेल्या परिसरात एक 20 वर्षांची मुलगी राहते. तिला अजून शिकायचे आहे; पण तिच्या घरच्यांनी तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठ्या मुलाबरोबर या मुलीचा विवाह ठरविला आहे. 3 डिसेंबर 2017 रोजी तिचा साखरपुडाही केला, तर 22 एप्रिल ही लग्नाची तारीख निश्चित केली. मात्र, लग्नाला काही दिवस शिल्लक असतानाच ही मुलगी घरातून निघून गेली आहे.

 

आई-वडील, मामा आणि आत्यावर केले आरोप 
त्यानंतर तिने परिमंडळ 3 पोलिस उपायुक्त यांच्या नावे भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला. या अर्जात तिने आपल्याला हे लग्न मान्य नसून, शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिने केलेल्या तक्रारी अर्जात आई-वडील, मामा आणि आत्या यांच्यावर आरोप केले आहेत. मुलगी घरातून निघून गेल्यामुळे आई-वडिलांनी तिच्या लहान बहिणीकडे लग्नाचा आग्रह केला; परंतु तिनेही मोठ्या बहिणीप्रमाणे घर सोडण्याचा पर्याय निवडला आहे. दोन्ही सख्ख्या बहिणी घरातून निघून गेल्याने कुटुंबात एकच गोंधळ उडाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...