आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई EXPRESSWAY वर 6 वाहनांचा विचित्र अपघात, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव वेगातील कंटेनरने ट्रकला धडक दिल्यानंतर पाठीमागून येणा-या चार कार कंटेनरवर जाऊन आदळल्या. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील बोरघाट आडोशी खोपोली हद्दीच्या उतारावर हा अपघात झाला. सुदैवाने या यात जीवितहानी   झाली नाही. 

 

यामध्ये ट्रकचालक जखमी झाला असून इतर सर्व सुखरुप आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे  वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

पुढील स्लाईडवर पहा अपघातग्रस्त वाहनांचे फोटो....

बातम्या आणखी आहेत...