आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने सामाजिक कार्यकर्त्यास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यास जबर मारहाण करण्यात आली. सचिन उद्धव शिंदे (वय 35, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने याबाबत तीन अज्ञात व्यक्‍तींच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये शिंदे यांनी फ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत स्थापत्य विषयक केलेल्या कामाची माहिती मागविली होती. या कामांमध्ये गैरव्यवहार असल्याचे दिसून आले, यामुळे 14 नोव्हेंबर 2016 मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी येथे तक्रार अर्ज दिला. या अर्जावर सुनावणी होऊन निगडी पोलिसांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले होते. शिंदे 11 मे 2018 रोजी काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यानंतर ते रात्री बारा वाजता चिंचवड रेल्वे स्टेशनला पोहचले. ड रेल्वे स्टेशन येथून आपल्या दुचाकीवरून मित्रासोबत चालले होते. मोहनगर येथील एक्‍साईज बॅटरी कंपनीजवळ आले असता पाठीमागून दुचाकीवरून तीनजण आले.  त्यांनी त्यास तूच सचिन शिंदे का, अशी विचारणा केली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देतो काय, असे म्हणत शिवीगाळ केली. 

तक्रार माघारी घे अन्यथा वाईट परिणाम होतील, असे म्हणत लाकडी दांडक्‍याने पायावर मारून उजव्या पायाच्या अंगठ्या लगतची चार बोटे फॅक्‍चर केली. शिंदे यांचा मित्र हा मध्यस्थी करण्यास पुढे आला असता आरोपींनी त्यास तुझा काही संबंध नाही, तू मध्ये पडू नकोस, असे सांगत दमदाटी केली. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...