आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिकेत जाधवचा खून करणाकरणारा कुख्‍यात गुंड सोन्या काळभोरवर कारागृहात हल्‍ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- टोळीयुद्धांतील पूर्वापार वैमनस्य मनात ठेवून गुंड अनिकेत जाधवची हत्या करणारा गुंड सोन्या काळभोरला जाधवच्या  टोळीतील तिघांनी येरवडा तुरुंगात मारहाण केली आहे. कारागृहातच हा प्रकार घडल्याने तुरुंगातील सुरक्षेवर शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दशरथ राजकुमार वाघमोडे, उत्तम प्रकाश गाढवे आणि गोट्या ऊर्फ लहू गायकवाड या तिघांवर येरवडा पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.   


पोलिसांच्या मते, कैद्यांना मोकळ्या जागेत आणले तेव्हा दशरथ वाघमोडेसमोर सोन्या काळभोर आला. काळभोरवर रावण टोळीचा म्होरक्या  अनिकेत जाधवचा खून केल्याचा आरोप आहे. काळभोर हा जाधवचा मावसभाऊ आहे. काळभोर समोर दिसताच  वाघमोडे आणि  साथीदारांनी जाधवच्या  खुनाचा राग काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हरांड्यातील बादली उचलून वाघमोडेने ती काळभोरच्या  डोक्यात मारली. त्यात काळभोर जखमी झाला. 


पोलिसांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण वेळीच थांबवले. काळभोरवर प्रथमोपचार करण्यात आले आणि तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काळभोरने आपल्या साथीदारांसह गेल्याच महिन्यात  आकुर्डी येथे अनिकेत जाधवचा खून केला होता. जाधव याची रावण टोळी तर काळभोरची महाकाली टोळी यांच्यातील  वैमनस्यात सततचे मारहाणीचे, खुनाचे प्रकार सुरू आहेत. यापूर्वीही निगडी पोलिस ठाण्यात या टोळ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...