आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांनी लिहून दिलेले भाषण पु.लं.नी वयाच्या 5व्या वर्षी हावभावासहित म्हणून दाखवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले असे पु. ल. देशपांडे यांचा मंगळवारी 12 जूनला स्मृती दिवस आहे. 8 नोव्हेंबर 1919 रोजी त्यांचा मुंबई येथे जन्म झाला. लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व सिरिअल्सचे निर्माते-दिग्दर्शक पु. ल. यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 12 जुन 2000 रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने divyamarathi.com देत आहे पु.ल. यांच्याविषयीची माहिती...


'पु लं'चा जन्म मुंबईतील गावदेवी परिसरातील कृपाल हेमराज चाळीत झाला. या चाळीतील अविस्मरणीय अनुभवांचा त्यांच्या लेखनातही उल्लेख झालेला दिसून येतो. त्यांचे वडीलांचे नाव लक्ष्मण तर आईचे लक्ष्मीबाई देशपांडे होते. 1960 च्या सुमारास देशपांडे कुटुंब ग्रांट रोडवरील किनवे हाऊस येथे राहायला आले. त्यानंतर देशपांडे कुटुंब विले पार्ले येथे स्थायिक झाले आणि 'पु लं' पुणे या विद्येच्या माहेरघरी आले.

 

'पु लं'चे शिक्षण
'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज येथून कॉलेज पूर्ण केले. भास्कर संगितालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले.


'पु लं'चे दोन लग्न
त्यांचे दोन लग्न झाले. 1940 च्या सुरवातीलाच त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्या कर्जत येथील दिवाडकर कुटुंबीयांतील होत्या. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुनिता ठाकूर होते. त्या मुळच्या रत्नागिरीच्या होत्या. लग्नाच्या 54 व्या वाढदिवसी 'पु लं'चे निधन झाले.


प्रोफेशनल लाईफ
मुंबईतील ओरियंट हायस्कूलमध्ये मिस्टर आणि मिसेस देशपांडे शिक्षक म्हणून नोकरीला होते. कर्नाटकातील बेळगाव येथे काही काळ 'पु लं'नी प्रोफेसर म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि संगितकार म्हणून करिअरला सुरवात केली.


संगीत क्षेत्रातही योगदान
पुलंनी संगीतकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले ते 1947 मध्ये ‘कुबेर’ या चित्रपटाद्वारे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा हा आणखी एक पैलू होता. संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशींसारख्या दिग्गजांना हार्मोनियमवर साथ दिली. इंद्रायणीकाठी भक्त तुझा रंगे, नाच रे मोरा यांसारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहे. ‘गुळाचा गणपती’ हा दिग्दर्शन - संगीत दिग्दर्शन - अभिनय असा सबकुछ पुलं असलेला चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील ‘इथेच टाका तंबू’, ‘सुवर्ण द्वारावतीचा राजा’ यांसारखी गाणी विशेष लोकप्रिय झाली. या सगळ्या गाण्यांना त्या काळात पुलंच्या हार्मोनियमची विशेष साथ होती. 


साधी, सरळ, समजावयास सोपी अशी गाणी आणि तितकेच साधे पण श्रवणीय असे पुलंनी दिलेले संगीत त्या काळात लोकप्रिय ठरले. कुबेर, मानाचे पान, गुळाचा गणपती, जागा भाड्याने देणे आहे हे त्यांचे चित्रपट विशेष लक्षात राहिले.

 

5व्या वर्षी हावभावासहित म्हणून दाखवले भाषण
पु.ल. देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसर्‍या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.


'पु. लं.'ना मिळालेले पुरस्कार
पुण्य भूषण (पुण्यभूषण) – 1993
पद्मभूषण (पद्मभूषण) – 1990
महाराष्ट्र गौरव (बहुरूपी)
पद्मश्री (पद्मश्री) – 1966
साहित्य अकादमी पुरस्कार (मराठी) – व्यक्ती आणि वल्ली (1965)
संगीत नाटक अकादमी पुरस्कार
महाराष्ट्र भूषण -1996.


पुढे स्लाईडद्वारे पाहा, पुलंचे अजरामर निवडक किस्से...

बातम्या आणखी आहेत...