आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे झाला होता इतिहासातील प्रसिद्ध \'पुरंदरचा तह\'? महाराजांना द्यावे लागले २३ किल्ले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इतिहासात 'अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर. या किल्ल्याला वज्रगड म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावरच झाला होता. या किल्ल्यावर काही दिवस पेशव्यांची राजधानीही होती. मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात इतिहासात प्रसिद्ध असलेला 'पुरंदरचा तह' आजच्याच दिवशी म्हणजे ११ जून १६६५ साली झाला. संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या किल्ल्याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

 

पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर पुरंदरचा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने मोठा आणि मजबूत असून अत्यंत सुरक्षित असा मानला जात होता. गडावर मोठ्या प्रमाणावर शिदोरी राहू शकत होती. तसेच दारूगोळा आणि धान्याचा साठा करून दीर्घकाळ किल्ला लढवता येऊ शकत होता, त्यामुळे या किल्ल्याला खास महत्त्व होते. या किल्ल्याच्या तीन बाजुंना दुर्गम परिसर होता.


किल्ला साधारणपणे १२०० वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. १४८९ च्या सुमारास निजामशाहीतील मलिक अहंमदने किल्ला जिंकला. १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास पाठवले तेव्हा याच किल्ल्यातून शिवरायांनी त्याला लढा दिला. पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने फत्तेखानाला पराभूत केले.


१६५५ मध्ये शिवरायांनी नेताजी पालकरला सरनौबत नेमले. १६ मे १६५७ ला संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. पण मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. त्यानंतर झालेल्या युद्धात मुरारबाजी पडला. त्यामुळे राजांना तह करावा लागला. हाच तो प्रसिद्ध पुरंदरचा तह. या तहात राजांना २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.


इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजीमहाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.


त्यानंतर १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासात प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.

 

पुढील स्लाइडवर पाहा किल्ल्याविषयीची माहिती....

 

बातम्या आणखी आहेत...