आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री श्री रविशंकर 13 ते 19 मार्च दरम्यान महाराष्ट्र दौ-यावर, पुण्यासह विविध शहरांना भेटी देणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. - Divya Marathi
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत.

पुणे- आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या दौ-यावर असून, राज्यातील विविध शहरांतील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहत. येत्या 13 ते 19 मार्च दरम्यान पुणे, सातारा, अहमदनगर व मुंबई या शहरांना भेट देणार आहेत. 

 

श्री श्री रविशंकर हे या दौ-याच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधण्यासोबत आपल्या साधकांना मार्गदर्शन करतील. आपल्या साधकांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्यासाठी गुरुदेव दरवर्षी महाराष्ट्राला भेट देत असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रात बरेच उपक्रम सुरू आहेत. 

 

श्री श्री रविशंकर यांचा असा असेल महाराष्ट्र दौरा-

 

- 13 मार्च : पुणे , सायंकाळी 6 ते 8 , ‘ज्ञान मोती’, VITS हॉटेल बालेवाडी
- 14 मार्च : सातारा – दुपारी 2.30 ते 5 , युवाचार्य संमेलन (खास युवकांसाठी)
- 15 मार्च : अहमदनगर – दुपारी 2.30 श्री श्रींच्या हस्ते ज्ञान मंदिर उद्घाटन सोहळा, गावडे मळा,
(बंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातील सुप्रसिध्द विशालाक्षी मंडपाची ही प्रतिकृती आहे)
- 15 मार्च : पुणे - सायंकाळी 6 ते 8 या वेळात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात भारती विद्यापीठ मैदान. कात्रज येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुप्रसिध्द गायक विक्रम हाजरा यांच्यासह ‘शिवसंजीवनी महासत्संग’.
- ओडिसा येथील श्री श्री युनिव्हर्सिटी येथे आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र तर्फे देणगी स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’ या मुलांच्या वसतिगृहाची अधिकृत घोषणा - गुरुदेव श्री श्री रविशंकर
- 16 ते 18 मार्च : मुंबई - विज्ञान भैरव – डोम एन.एस.सी.आय, वरळी ( विशेष आमंत्रितांसाठी)
- 18 मार्च : मुंबई – सायंकाळी 6 ते 8 , गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात महालक्ष्मी होम व सत्संग, घाटकोपर पोलिस ग्राउंड.
- 19 मार्च : मुंबई, सकाळी 8 वाजता रूद्रपूजा

 

आर्ट लिव्हिंगचे महाराष्ट्रात सध्या कोणते कोणते उपक्रम सुरू आहेत-

 

- भारतात 38 नद्या व त्याच्या अनेक उपनद्यांचे पुनरुज्जीवन आर्ट ऑफ लिव्हिंगकडून सुरू आहे. त्यापैकी बहुतांश नद्या महाराष्ट्रात आहेत. याद्वारे 3 हजार गावांना व कोट्यावधी लोकांना फायदा होणार आहे.
- आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे महाराष्ट्रात हजारो शौचालये बांधली. त्यामुळे अनेक गावे पाणंदमुक्त झाली.
- सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण वर्ग, सोबतच नदी किनारी लाखो वृक्षांचे रोपण केले.
- प्राण शिबिराद्वारे हजारो लोकांना व्यसनमुक्त बनविण्यासोबत आरोग्यदायी बनविण्यासाठी उपक्रम राबवले.
 
कोण आहेत श्री श्री रविशंकर-

 

- श्री श्री रविशंकर हे एक प्रख्यात आध्यात्मिक गुरु आणि बहुआयामी मानवतावादी आहेत.
- हिंसामुक्त जग निर्माण करण्याच्या त्यांच्या स्वप्नामुळे जगभरातील करोडो लोकांना स्फूर्ती मिळाली आहे. 
- सेवाकार्य आणि परस्पर संवाद यातून जगात शांती प्रस्थापित करण्याचे कार्य करणारे श्री श्री
म्हणजे अहिंसा आणि वैश्विक मानवी मूल्ये याचे मूर्तिमंत रूप आहेत.
- श्री श्री करत असलेले सेवेचे आवाहन जात, धर्म, राष्ट्र या सर्वांच्या पलीकडे आहे. करोडो लोक त्यांना गुरु स्थानी मानतात आणि आंतरिक शांती आणि मार्गदर्शन यासाठी त्यांच्याकडे येतात. 
- गुरुदेवांच्या तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाजाच्या स्वप्नामुळे हजारो लोकांना सेवा प्रकल्प हाती घेऊन यशस्वी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...