आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौंडमधील गोळीबार थरार: संजय शिंदेला 12 दिवसाची पोलिस कोठडी, कर्जबाजारी झाल्याने कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अार्थिक व्यवहाराच्या वादातून पुणे जिल्हयातील दाैंड येथे मंगळवारी भारतीय राखीव दलाच्या (अायअारबी) सहाय्यक उपनिरीक्षकाने सर्व्हिस रिव्हाॅल्वर मधून तिघांवर गाेळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला हाेता. याप्रकरणी अाराेपी संजय शिंदे (वय-32,रा.दाैंड, पुणे) याला बुधवारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात पुणे ग्रामीण पाेलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हजर केले. मुख्य न्यायाधीश एस.सी.कटारे यांच्या न्यायालयाने याप्रकरणी अाराेपी शिंदे याला 29 जानेवारी पर्यंत म्हणजेच 12 दिवस पाेलीस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहे. 

 

पाेलीसांनी अाराेपी शिंदे यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने, पाेलीसांबद्दल तुला काही तक्रार अाहे का अाणि तुला काही न्यायालया समाेर बाेलयचे अाहे का अशी विचारणा केली. त्यावर अाराेपी शिंदे याने पाेलीसांबाबत काेणतीही तक्रार नसल्याचे सांगत, अापणास काही बाेलयचे नाही असे सांगितले. त्यानंतर तु काेणत्या विभागात अाणि कधीपासून काम करताे अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर, अाराेपीने भारतीय राखीव दलातील अायअारबीत सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून काेल्हापूरच्या कंपनीत काम करत असून सध्या दाैंड येथे नेमणुकीस असल्याचे सांगत, मागील 12 वर्षापासून पाेलीस खात्यात असल्याचे सांगितले. सरकारी वकील एस.सी.लिंगायत यांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की, सदर गुन्हा माेठा असून अाराेपीचे याप्रकरणात काेणी अन्य साथीदार अाहेत का याची तपासणी करावयाची अाहे, अाराेपीने घटनेवेळी सहा राऊंड फायर केले असून त्याच्या ताब्यातून एक पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात अाली अाहे. गुन्हयात अाराेपीने वापरलेली दुचाकी जप्त करावयाची बाकी असून नियाेजनबध्द अाराेपीने तिहेरी खून केले असून या कटात अन्य काेण सहभागी अाहेत याबाबत पाेलीसांना तपास करावयाचा अाहे. बचाव पक्षाचे वकील हेमंत झंजाड यांनी प्रतिवाद करताना बचाव पक्षाची बाजू मांडत, पक्षकारास पाेलीस काेठडी देण्यात येऊ नये असा बचाव केला. 

 

दाैंडमध्ये तीन जणांवर अंत्यसंस्कार-

 

अााराेपी संजय शिंदे याचा गाेपाळ शिंदे याच्यासाेबत दहा हजार रुपयांच्या पैशांवरुन वाद सुरु हाेता. तर अनिल जाधव याने 20 वर्षापूर्वी शिंदे याच्या अार्इला मारहाण केल्याने त्याचा राग अाराेपीच्या मनात हाेता. या कारणांवरुन शिंदे याने गाेपाळ शिंदे, त्याचा मित्र परशुराम पवार व अनिल जाधव यांचा गाेळया घालून खून केला. बुधवारी शाेकाकुल वातावरणात दाैंड येथील स्मशानभूमीत सदर तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात अाले. काेणताही अनूचित प्रकार यावेळी घडू नये याकरिता पाेलीसांनी माेठा बंदाेबस्त दाैंड शहरात तैनात केला. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अाराेपी संजय शिंदे याला दाैंड येथील न्यायालयात हजर न करता त्यास पुण्यातील न्यायालयात पाेलीसांनी हजर केले. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज....