आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाैंडमधील थरार: जुगारातील पैसे परत मागणाऱ्या तिघांना SRPF पोलिसाने घातल्या गाेळ्या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे / बारामती- मटका, जुगाराच्या व्यवहारातून उसने घेतलेले पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावणाऱ्या तिघांचा राज्य राखीव दलातील सहायक पाेलिस निरीक्षकाने अापल्या पिस्टलमधून गाेळ्या झाडून तिघांचा खून केला. दाैंड (जि.पुणे) शहरात मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तिघांचे खून केल्यानंतर अाराेपी संजय शिंदे याने पिस्टलसह एका खाेलीत बंद करून घेतले हाेते, त्यामुळे पाेलिसांनी त्याच्या घराला वेढा टाकला हाेता.  मात्र काही वेळातच पाेलिसांना गुंगारा देऊन ताे दुचाकीवर पसार झाला.  पाेलिसांनी पाठलाग करत माेबाइल लाेकेशनच्या अाधारे अखेर सुपा (जि. नगर) येथून त्याला अटक केली.  त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील पिस्टल, दुचाकी जप्त करण्यात अाली. गाेपाळ शिंदे (वय ३०), प्रशांत पवार (३२, दाेघे रा. वडार गल्ली, दाैंड) व अनिल विलास जाधव (३८, रा. बाेरावकेनगर, दाैंड) अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे अाहेत. 

 
अाराेपी संजय शिंदे हा राज्य राखीव दलाच्या काेल्हापूर विभागातील ग्रुप १६ बटालियनचा जवान अाहे. त्याला दाैंड येथील शस्त्रागार विभागात नियुक्ती देण्यात अाली हाेती. मागील काही दिवसांपासून गाेपाळ शिंदे, प्रशांत पवार व अनिल जाधव यांच्याशी त्याचे पैशाचे व्यवहार झाले हाेते. याच कारणावरून त्यांच्यात वादविवादही सुरू हाेता. मंगळवारी दुपारी अाराेपी संजय शिंदे अापल्या शासकीय पिस्टलसह नगरमाेरी येथील चाैकात या तिघांचा शाेध घेत अाला हाेता. गाेपाळ शिंदे व प्रशांत पवार हे त्याला दुचाकीवरून जाताना दिसले. त्याने या दाेघांवर बेछूट गाेळीबार केला. या हल्ल्यात हे दाेघेही रक्ताच्या थाराेळ्यात रस्त्यावर पडले. काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. नंतर १० ते १५ मिनिटाच्या अंतराने अाराेपी संजयने बाेरावकेनगर भागातील अनिल जाधवच्या घरात जाऊन त्याच्यावरही गाेळ्या झाडल्या. यात अनिलचाही जागीच मृत्यू झाला. दाेन ठिकाणी भरदिवसा गाेळीबार झाल्यामुळे परिसरातील घाबरलेले नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले. बाजारपेठेतील दुकानेही तातडीने बंद करण्यात अाली. संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

१५ मिनिटे, २ जागा, ३ खून-

 

संजय शिंदेने मंगळवारी दुपारी आपल्या सर्व्हिस पिस्टलसह नगरमाेरी येथील चाैकात जाऊन दुचाकीवरील गाेपाळ शिंदे व प्रशांत पवार या दाेघांवर बेछूट गाेळीबार करत त्यांचा खून केला. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत ताे बाेरावकेनगर येथील मित्र अनिल जाधव यांच्या घरात गेला. तेथे त्याने जाधव यांच्यावर गाेळीबार करून खून केला.

 

पाेलिसांचा वेढा, तरीही पसार-


तीन जणांना मारल्यानंतर अाराेपी संजय गाेपाळवाडी रस्त्यावरील घरात जाऊन बसला. त्यामुळे पाेलिसांनी अाराेपीच्या घराकडे धाव घेतली. मात्र संजय पिस्टलसह असल्याचे कळाल्यामुळे पाेलिसांनी घरात जाण्याचे धाडस केले नाही. घराबाहेर वेढा देऊन पाेलिसांनी संजयला बाहेर येण्याचे अावाहन केले. शीघ्र कृती दलाचे जवानही दाखल झाले. काही वेळाने बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या पाेलिसांनी घरात जाऊन पाहिले, मात्र संजय सापडला नाही. ताे दुचाकीवरून पळून गेल्याचे सांगण्यात अाले.  

 

संजयला हाेता जुगाराचा नाद -


पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे यास मटका, जुगार खेळण्याचा नाद हाेता. त्याचा नातेवार्इक गाेपाळ शिंदे, मित्र प्रशांत पवार, अनिल जाधव व संजय हे एकत्रित सट्टा खेळत असत. याच जुगारातून त्यांच्यात अार्थिक व्यवहारही झाले हाेते. मृत तिघांनी संजय शिंदे यास उसने पैसे दिले हाेते. मात्र संजय पाेलिसी धाक दाखवून ते परत देत नव्हता. या तिघांनीही पैसे परत मिळण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला हाेता. या रागातूनच संजय शिंदे याने तिघांना ठार मारल्याचा प्राथमिक संशय अाहे.

 

माेबाइल लाेकेशनवरून माग-


अाराेपी संजयच्या शाेधासाठी पाेलिसांनी नाकेबंदी केली. माेबाइल लाेकेशनवरून त्याचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने नगर जिल्ह्यातील सुपा या गावात संजयचे लाेकेशन मिळाले. त्या अाधारे दाैंड पाेलिसांनी स्थानिक पाेलिसांच्या मदतीने संजयला अटक केली.  

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज....  

बातम्या आणखी आहेत...