आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा केली, म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चित्रकलेचे पुस्तक फाडल्याने मित्रासोबत वाद झाल्यानंतर शिक्षकांनी चार जणांना पाच दिवस शाळेत येण्यास मनाई केली. त्यामुळे देहू राेड येथील शाळेत दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलाने मंगळवारी नदीत उडी घेऊन अात्महत्या केली. एनडीअारएफच्या पथकाने बुधवारी सकाळी खाणीच्या पाण्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. शुभम सुरवाडे (रा.देहू राेड,पुणे) असे अात्महत्या केलेल्या मुलाचे नाव अाहे. 


शुभम हा देहू राेडच्या शाळेत शिक्षण घेत हाेता. मंगळवारी सायंकाळी ताे शिकवणीसाठी घरातून गेला हाेता. बराच वेळ हाेऊनही ताे न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांना खाणीजवळ त्याची बॅग सापडली. बुधवारी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, शुभमने अात्महत्येपूर्वी हिंदीत लिहिलेली नाेट पाेलिसांना सापडली असून आत्महत्येसाठी शिक्षकच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...