आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड महापालिकेतच विद्यार्थ्‍यांनी भरवली शाळा, आयुक्‍तालयाला विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- गेल्या कित्येक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्‍ये आयुक्तालयाची मागणी प्रलंबित होती. कसाबसा हा प्रश्न मार्गी लागल्यांनातर आता आयुक्तालय जागेच्या वादात अडकला आहे. नवीन आयुक्तालयासाठी शहरातील चार जागेंचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून महापालिकेला देण्यात आला होता. त्यानुसार प्रेम लोक पार्क मधील महात्मा फुले शाळेची इमारत आयुक्तालयासाठी देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर दळवी नगर येथील शाळेत करण्‍यात येणार आहे. प्रशासनाच्‍या या निर्णयाला विद्यार्थी आणि पालकांनी मात्र विरोध दर्शविला आहे.


विद्यार्थ्यांचे स्थलांतर न करता आयुक्तालयासाठी नवीन जागा शोधण्यात यावी ही मागणी करत आज बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या आवारातच शाळा भरवली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी 'शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतं देणार नाही घेतल्‍या शिवाय राहणार नाही' अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी आणि पालकांच्या या निदर्शनाला छावा क्रांतिवीर संघटना, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या वतीने देखील पाठींबा देण्यात आला आहे.

 

यावेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, शहराध्य संजोग वाघेरे, विठ्ठल नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदी उपस्थित होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...