आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरगाव भीमा हिंसाचार, माओवाद्यांशी संबंधाचे प्रकरण, सुधीर ढवळेंसह तिघांच्या कोठडीत वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटकेत असलेले सुधीर ढवळे यांच्यासह तीन आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तिघांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुण्यातील एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळेंसह रोना विल्सन, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली होती.

 

तिघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांनी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करावी अशी मागणी कोली. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत 21 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 


सरकारी वकिलांनी उपस्थित केले मुद्दे -
सरकारी वकिलांनी आज कोर्टा मुद्दे उपस्थित करताना सांगितले, अटकेत असलेले सर्व आरोपी नक्षल कारवायांमध्ये सक्रीय आहेत.  त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचवला आहे. आरोपींचा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग स्पष्ट झाला आहे. यांच्यातील नविन बाबू हा कार्यकर्ता पोलीस कारवाईत मारला गेल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याच्या स्मरणार्थ जेएनयूमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यातून विद्यार्थ्यांना प्रतिबंधित संघटनेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...