आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीची 'गुढी': आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी तरुणाई, मदतीसाठी घेतला पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दुष्काळ, कर्जबाजारीपणा अादी कारणांमुळे आत्महत्येचा  मार्ग स्वीकारलेल्या शेतकऱ्यांच्या  घराच्या दारी पुणेकर तरुणाईने रविवारी ‘अन्नदाता गुढी’ उभारली आणि  कुटुंबीयांचे  अश्रू पुसले.    


अमित बागुल आणि त्यांच्या  सहकाऱ्यांनी रविवारी गुढीपाडव्याच्या  दिवशी  नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील  सोंदाळा  गावातील शेतकरी सूर्यभान ज्ञानदेव अरगडे (३२), उत्सव धुमाला  गावातील शेतकरी दिलीप काकडे (४२) व शेतकरी पांडुरंग रामा कदम  यांच्या कुटुंबीयांची  भेट घेतली. या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा  मार्ग स्वीकारला होता. त्यांच्या  कुटुंबाचे सांत्वन करून तरुणाईने त्यांच्या  दारात अन्नदाता गुढी उभारून उमेद जागवण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांच्या  घरातला काळाने पुसून टाकलेला  आनंद, उत्साह जागृत केला आणि त्यांचे  अश्रूही पुसले. तिन्ही कुटुंबीयांना  या तरुणाईने स्वकमाईतून जमा केलेले प्रत्येकी अकरा हजार रुपयेही दिले.   


कामटे, महाडिकांच्या घरीही गुढी

याआधी या तरुणांनी मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे तसेच कर्नल संतोष महाडिक यांच्या  घरी आम्ही शौर्य गुढी उभारली होती. 

बातम्या आणखी आहेत...