आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: 'पालघरमध्ये मतदारांना प्रभावित केल्याने मुख्यमंत्री फडणवीसांवर गुन्हा दाखल करा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पालघर लोकसभा पोट निवडणुकीतील प्रचारातील देवेंद्र फडणवीस यांची ध्वनीफित फिरत आहे. यात त्यांनी 'निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करावा' अशा आशयाचा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुंडगिरी करा, दहशत करा, वेगवेगळी प्रलोभने –   आमिषे द्या सर्व सरकारी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे असेच मुख्यमंत्र्यांनी सुचवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे. 

 

मारूती भापकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी टोळी प्रमुखाच्या गुर्मीत आपल्या चेल्यांना आदेश दिले आहेत. जशास तसं उत्तर द्या अशी चेतावणी मुख्यमंत्री देत असतील तर मग राज्य, कायदा, पोलिस न्यायालये हवीतच कश्याला? मागील 3 दिवसांत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पालघर लोकसभा मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुचणेनुसार गुंडगिरी करतायत तसेच खुलेआम पैसे वाटप करताना पकडले जात आहेत. सोमवारी पालघर लोकसभा मतदार संघात मतदान सुरु असतानाही कार्यकर्ते दहशत करत होते व पैसे वाटप केल्याचे समोर आले आहे. तसेच जी ध्वनीफित व्हायरल झाली आहे त्यातील आवाज आपलाच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेले आहे. 

 

साम, दाम, दंड, भेद याचा नवा अर्थ कूट नीती असा सांगितला तरी कूट नीतीने निवडणुका जिंकाव्या असे घटनेत कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे मतदारांना प्रभावित करते व भारतीय घटनेच्या कलम 171 (फ) (क), प्रमाणे गंभीर गुन्हा ठरतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मारूती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...