आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंशाच्या दिव्यासाठी 46 वर्षीय शिक्षकाचे 19 वर्षीय युवतीशी लग्न, आरोपी पतीसह 7 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी उत्तम काळे याने आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न केल्याने लोकांमधून संताप व्यकत् केला जात आहे. - Divya Marathi
आरोपी उत्तम काळे याने आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न केल्याने लोकांमधून संताप व्यकत् केला जात आहे.

पुणे- पिंपरी-चिंचवड मधील सांगवी येथे 19 वर्षीय युवतीचा उस्मानाबादमधील 46 वर्षीय शिक्षकासोबत जबरदस्तीने विवाह लावण्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकासह 7 जणांना अटक केली आहे. पीडित तरुणीने आई वडिलांसह सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली त्यांनतर तिच्या आईवडिलांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला होता. 

 

डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवी सांगवी परिसरात राहणा-या एका 19 वर्षीय युवतीच्या आईवडिलांनी तिचे लग्न उस्माबाद जिल्हापरिषेदत शिक्षक असलेल्या उत्तम विठ्ठल काळे याच्याशी जमवले होते. पण पीडित युवतीचा या विवाहास विरोध होता. उत्तमने पीडितेच्या आईवडिलांना पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे तसेच कर्ज फेडण्याचे आमिष दाखवले होते. उत्तमला 14 वर्षांची एक मुलगी असून, त्याला मुलगा हवा होता त्यासाठी तो दुसरे लग्न करणार होता. पीडितेच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचे जबरदस्तीने 22 मार्च रोजी उत्तमशी लग्न लावून दिले. आईवडिलांच्या धमकीमुळे ती शांत होती. पीडितेने उस्मानाबादला नांदायला गेल्यानंतर तेथील पोलिसांनी सोशल मीडिया द्वारा व्हिडिओ पाठवून आणि आपली करुण कहाणी सांगितली. उस्मानाबाद पोलिसांनी तिला सांगवी येथे आई वडिलांकडे सोडले मात्र त्यांनी देखील तुला नांदावच लागेल अशी धमकी दिली शिवाय तिला काही दिवस खोलीत बंद करुन ठेवले. यानंतर पीडितेने एका मैत्रिणीच्या मदतीने  थेट सांगवी पोलीस ठाणे गाठत आई वडिलांसह सासरच्या 15 जणाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर उस्मानबाद जिलहा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षक उत्तम काळे याला आणि लग्नासाठी मध्यस्थी करणा-या 6 जणांना अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...