आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे अांदाेलन मागे, बारावीचा निकाल वेळेतच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी तपासलेले पेपर बोर्डाकडे जमा करण्याचा निर्णय घेतल्याने बारावीचा निकाल वेळेवर लागण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी तपासलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा केल्या जाणार आहेत.


राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी डिसेंबर २०१७ पासून विविध मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता वेळेत न केल्याने शिक्षकांनी तपासलेल्या बारावीच्या ८० लाख उत्तरपत्रिका बोर्डाकडे न सोपवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बारावीचा निकाल ५ जूनपूर्वी लावणे अपेक्षित आहे. शिक्षक महासंघाच्या आंदोलने व पवित्र्यामुळे बारावीच्या निकालाला पुढची तारीख मिळते की काय, अशी शंका उपस्थित होत होती.

 

या मागण्या झाल्या मान्य   
- मूल्यांकन झालेल्या कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाइन जाहीर करावी.   
- २०१२ पासून नियुक्त व नाहरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना नियुक्ती मान्यता देण्यात यावी.   
- शिक्षकांच्या वेतनासंबंधीच्या तरतुदींसाठी अर्थमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करावी.

बातम्या आणखी आहेत...