आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती वादातुन आईची दोन मुलांसह इंद्रायणी नदीत उडी, एका मुलाचा मृत्यु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील मावळ परिसरामध्ये घरगुती वादातून झालेल्या भांडणातून आईने आपल्या दोन मुलांसह आंबी पुलावरुन इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात सुदैवाने आई बचावली आहे.मात्र,एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, त्याचा  मृतदेह पोलिसांच्या हाती लागला तर दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला अवधेश केवट वय-२९ रा.आंबी मूळ उत्तर प्रदेश,आणि पती अवधेश यांचे सोमवारी रात्री किरकोळ भांडण झाले होते.याच रागातून पती कामावर गेल्यानंतर पत्नीने अमन अवधेश केवट वय-४ आणि अमर अवधेश केवट वय दीड वर्षे यांना घेऊन आंबी येथील इंद्रायणी नदीत उडी घेत जीवन सपंविण्याचा प्रयत्न केला,परंतु यात मुलांची आई वाचली असून दुर्दैवाने चार वर्षीय अमनचा मृत्यू झाला आहे. तर अमर चा शोध सुरु आहे .या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस तपास करीत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...