आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकास डुलकी लागल्याने ट्रक नदीपात्रात काेसळला, पुण्‍यात 2 जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - २१ टन कच्चे लाेखंड घेऊन जात असलेल्या ट्रकचालकास डुलकी लागल्याने शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास जुन्या संगम पुलावरून ५० फूट खाली नदीपात्रात काेसळून ट्रकचालक व क्लीनरचा मृत्यू झाला.

 

चंद्रकांत शिव अण्णा (३१, रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे मृत ट्रकचालकाचे नाव अाहे. तर, क्लीनर स्वामी (पूर्ण नाव नाही, रा. गुलबर्गा, कर्नाटक) याचा मृतदेह ट्रकमध्ये पाणी शिरल्याने काढता येणे अशक्य झाले. सुमारे दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हा ट्रक अलिबाग परिसरातील अाळंद येथून २१ टन वजनाचे कच्चे लाेखंड घेऊन हैदराबाद येथे शनिवारी रात्री जात हाेता.


पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक चंद्रकांत शिवअण्णा याला डुलकी लागल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला घासून नदीपात्रात पडला. ट्रक नदीपात्रात उलटा कोसळल्याने ट्रकमधील सामान नदीपात्रात पडले. तर ट्रकचालक अाणि क्लिनरला ट्रकमधून बाहेर पडता न अाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासांच्या परिश्रमानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह ट्रकबाहेर काढले.

 

बातम्या आणखी आहेत...