आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune: सेल्फी घेताना इंद्रायणी नदीत बुडाल्‍या 3 मुली, एकीचा मृत्‍यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- इंद्रायणी नदीच्‍या किना-यावर सेल्‍फी घेताना तीन मुली मंगळवारी नदीत पडल्‍या. यापैकी 2 मुलींना वाचवण्‍यात यश आले आहे. मात्र एका मुलीचा बुडून मृत्‍यू झाला.

 

अशी झाली दुर्घटना 
मंगळवारी पुण्‍याच्‍या देहूरोडजवळील इंद्रायणी नदीच्‍या किना-यावर उभे राहून 3 मुली सेल्‍फी घेत होत्‍या. त्‍यादरम्‍यान एकीचे संतूलन ढासाळले व ती नदीत पडू लागली. यादरम्‍यान तिला वाचवण्‍याच्‍या प्रयत्‍नात दोन्‍ही मुलींचा किना-यावरून पाय घसरला व त्‍याही नदीत पडल्‍या. मात्र दोन्‍ही मुली  नदीतील एका दगडाच्‍या साहाय्याने टिकून राहिल्‍या. नंतर गावक-यांनी घटनास्‍थळी धाव घेत त्‍यांचे प्राण वाचवले. मात्र तोपर्यंत तिस-या मुलीचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला होता. शालिनी चंद्रबालन (17) असे तिचे नाव आहे.

 

अनेक तासानंतर मृतदेह काढला बाहेर 
घटनेच्‍या काही तासानंतर बचाव पथकाने 17 वर्षीय शालिनी चंद्रबालनचा मृतदेह नदीबाहेर काढला. शालिनी बी.कॉम फर्स्‍ट वर्षाची विद्यार्थीनी होती. 

 

  

 

 

बातम्या आणखी आहेत...