आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- जिल्ह्यातील वर्णे गावात एका कुटुंबातील तीन जणांचा विजेचा शाॅक लागल्याने मृत्यू झाला आहे. यात पती पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे पर हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. सकाळी शेतात गेलेले कुटुंब रात्रीपर्यंत घरी न परतल्याने त्यांना शोधण्यासाठी लोक गेले त्यावेळी ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी गावात आणण्यात आले.

 

मिळालेल्या माहिती नुसार सुरेश पांडूरंग काळंगे (वय 48), पत्नी सौ. संगीता सुरेश काळंगे (वय 40) व मुलगा सर्वेश सुरेश काळंगे (वय 16) अशी तिघांची नावे आहेत. सुरेश काळंगे हे शनिवारी सकाळी पत्नी व मुलासमवेत शेताकडे गेले होते. सकाळी  रानात गेलेले हे कुटूंबिय सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईंकाना संशय आला. सुरेश यांचा मावसभाऊ श्रीमंत काळंगे शेतात त्यांना पाहण्यासाठी गेले. त्यावेळी तिघांचे मृतदेह बांधावर आढळले. त्यांच्या मृत्यूविषयी गावात तर्कवितर्क लढवले जात आहे. विहिरीवरील मोटर सुरू करत असताना सुरेश यांना शॉक बसला. जवळच असलेले पत्नी संगीता व मुलगा सर्वेश त्यांच्या मदतीला धावले. मात्र, त्यांचाही शॉक बसून जागीच मृत्यू झाल्याचीही चर्चा गावात सुरू होती. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी पोहचून तपासास सुरुवात केली. दरम्यान तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...