आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस असल्याचे सांगून तिघांचे राहत्या घरातून kidnapping, पुण्यातील खळबळजनक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पोलिसांच्या वेशात येऊन तीन जणांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बावधन परिसरात घडली आहे.  गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून चार ते पाच जणांनी तीघांना राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेले. यामध्ये पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. हा प्रकार रविवारी (दि.२०) पाटीलनगर बावधन येथे घडला. निलभ रतन (वय-२७), रोमासिंग (वय-२६) आणि दर्श (वय-५) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. तर जैनेस बी.के आणि एक महिला आणि अन्य साथीदार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय महिलने फिर्याद दिली आहे.

 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बावधन परिसरातील पाटील नगर येथे रविवारी विंग अनंत शिलया सोसायटी मध्ये राहणाऱ्या रोमासिंग यांच्या घरी दुपारी दोनच्या सुमारास चार ते पाच जण त्यांच्या घरी आले. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे बतावणी करून घरात प्रवेश केला. तसेच त्यांच्याबरोबर आलेल्या इतर दोन ते तीन व्यक्तींनी आणि एका महिलेने उत्तर प्रदेश पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये कोर्ट केस सुरु असून त्याच्या तपासकामी आमच्याबरोबर यावे लागेल असे सांगून भाऊ निलभ रतन, भावजय रोमासिंग आणि पुतण्या दर्श यांना बळजबरीने घेऊन गेले. या तिघांना घेऊन जात असताना रोमासिंग यांचा पहिला पतीदेखील त्यांच्यासमेवत असल्याचे फिर्यादीने सांगितले.

 

हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलीस, तसेच पुणे नियंत्रण कक्षाकडे चौकशी कली असता अशी कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी निलभ याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केले आसता तो बंद लागत आहे. हिंजवडी पोलीस आरोपी आणि अपहरण झालेल्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत. रोमासिंग ही फिर्य़ादी यांची भावजय असून तिचे पहिले लग्न झाले होते. तिने पहिल्या पतीपासून सोडचिठ्ठी घेऊन दुसरे लग्न केले.

 

बातम्या आणखी आहेत...