आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे- आणखी एका शिवसैनिकावर खुनी हल्ला, जुन्नरमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवसेनेचे जुन्नर उपतालुकाप्रमुखावर अज्ञात तीन जणांनी खुनी हल्ला केला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. राजाराम कोंडाजी चव्हाण (वय-40, रा. वडज. ता. जुन्नर) यांच्या असे हल्ला झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. चव्हाण यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली व नंतर दांडक्यांनी व लोखंडी पाईपने हल्ला केला. यात हल्लात चव्हाण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जुन्नर येथे उपचार सुरू आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे आपल्या वडज गावातून नारायणगावला दुचाकीवरून चालले होते. रस्त्यातून जात असताना दुचाकी घेऊन तीन थांबले होते. त्यातील एकाने चव्हाण यांना हात केला. पेट्रोल वगैरे संपले असेल म्हणून चव्हाण यांनी आपली गाडी थांबवली. मात्र, त्यातील दुस-याने काही कळायच्या आताच त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर दांडक्याने व लोखंडी पाईपने हल्ला केला. यात चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अजय गोरड करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...