आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- बेंगलुरु महामार्गावर भरधाव स्विफ्ट कार झाडाला धडकली, तीन जणांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- पुणे बंगलुरु महामार्गावर इटकरे फाटा येथे गुरुवारी सकाळी भरधाव स्विफ्ट कार झाडावर आदळली. या अपघातात पुणे जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांना इस्लामपुरातील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अमोल लक्ष्मण मुंगसे (वय, 24 रा.विरदवाडी ता.खेड. जि.पुणे.), दत्ता जाधव (२5), धनंजय पठारे (रा. पठारेवाडी. ता .खेड) यांच्या मृत्यू झाला असून जखमींची नावे कळू शकली नाहीत. पोलिसाxनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...