आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकला कार धडकल्याने कुटुंबच संपले; कात्रजच्या बोगद्याजवळ अपघातात चार ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चालकाला विश्रांती मिळावी म्हणून थोडा वेळ कार चालवण्यास घेतलेल्या मुलासह कुटुंबातील अन्य तिघांचा ट्रकला मागून धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा मार्गावरील कात्रज बोगद्याजवळ घडली. मृत चाैघांपैकी तिघे मुंबईतील एकाच कुटुंबातील अाहेत.


मूळचे मुंबईतील सायन येथील रहिवासी असलेले डॉ. यशवंत माने हे पत्नी शारदा, मुलगा ऋषिकेश आणि कारचालक रामचंद्र कृष्णा सुर्वेसह साताऱ्यात शिकत असलेल्या मुलीला सोडण्यासाठी रविवारी त्यांच्या ऑल्टो कारने  (एमएच ०१ बीएफ ७६८९) गेले होते. तिला महाविद्यालयात सोडून सुर्वे कुटुंबीय रविवारी रात्रीच साताऱ्याहून परत मुंबईकडे निघाले.  त्या वेळी  चालक रामचंद्र सुर्वे हा कार चालवत हाेता. मात्र, पहाटेच्या सुमारास त्याला थोडा वेळ अाराम मिळावा यासाठी ऋषिकेशने कार चालवण्यास घेतली. दरम्यान, पावणेचार वाजेच्या सुमारास कात्रज बाेगदा अाेलांडून ते जांभूळवाडी दरीपुलाकडे जात होते. भरधाव असलेल्या कारवरील ऋषिकेशचे नियंत्रण अचानक सुटले आणि ती थेट (यूपी २५ सीटी ३६१२) ट्रकला पाठीमागून धडकली. ही कार ट्रकमध्ये अडकून सुमारे १०० मीटर पुढे फरपटत गेली. यात कार अक्षरश: चेंदामेंदा झाली. या भीषण अपघातात डाॅ. यशवंत पांडुरंग माने (५६), शारदा यशवंत माने (४७), ऋषिकेश यशवंत माने (२०) अाणि कारचालक रामचंद्र कृष्णा सुर्वे (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नंतर त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले. याप्रकरणी ट्रकचालक अाेमकार कथाली रामपासला (रा. उत्तर प्रदेश) पोलिसांनी चाैकशीकरिता ताब्यात घेतले अाहे.    

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... ट्रक आणि कार अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...