आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- चौथा शनिवार, रविवार, सोमवारी बुद्ध पोर्णिमा आणि मंगळवारी कामगार दिन अशा सलग चार दिवस सुट्ट्यांमुळे भटकंतीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे पुणे, मुंबई आणि कोकणात जाणारे लोक सकाळपासून एक्सप्रेसवे वर अडकले आहेत.
चार दिवसांचा लाँग वीक एंड आला आहे तसेच उन्हाळाची सुट्टी सुरु आहे. अनेकांनी सुट्टीसाठी बाहेर जाण्याचे बेत आखले पण आज सकाळपासून त्यांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लगला आहे. हीच परिस्थिती पुणे -बंगलुरु तसेच मुंबई गोवा महामार्गावर आहे. दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासभर लागत आहेत. दरम्यान, अवजड वाहने जुन्या मार्गावरून वळवण्यात येत आहेत. पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महामार्ग पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे आजपेक्षा उद्या महामार्गावर अधिक वाहने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. माणगाव येथे 5 किमी पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या असल्याने मुंबईकरांना सकाळी मनस्ताप सहन करावा लागला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.