आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वर ट्रकने घेतला पेट; दीड तासानंतर आगीवर नियंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे वर ट्रकने अचानक पेट घेतला. खापोली स्‍टेशन जवळ ही घटना घडली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्‍कळीत झाली होती. आय.आर.बी. ची रेस्क्यू टिम, देवदूत पथका सह अग्नीशमक दलाच्‍या चार गाड्या तातडीने घटना स्थळी दाखल झाल्‍या. दीड तासाच्‍या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रन मिळवण्‍यात यश आले आहे.   


कोळशाने भरलेला ट्रक मुंबईहून पुणे कडे जात होता. सायंकाळी 5 वा. खोपोली स्‍टेशन जवळ आल्‍यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला. आग इतकी भयानक होती की, त्‍यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. घटने नंतर महामार्गावरील वाहतूक विस्‍क‍ळीत झाली होती. दीड तासाच्‍या अथक प्रयत्‍नानंतर आगीवर नियंत्रन मिळवण्‍यात यश आले. सुदैवाने यामध्‍ये कुठलीही जीवितहाणी झानी नाही.    

बातम्या आणखी आहेत...