आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल दर्शनाच्या ओढीने तुकोबांच्या पालखीने पार केला अवघड रोटी घाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या ज्या आम्हापाशी होतील ज्या शक्ती। तेणे हा श्रीपती अळंकारू ।।

अवघा पायापाशी दिला जीवभाव। जन्ममरणां ठाव पुसियेला ।।

ज्यांचे देणे त्यासी घातला संकल्प । बंधनाचे पाप चुकवले ।।

तुका म्हणे येथे उरला विठ्ठल । खाय बोले बोल गाये नाचे।। 

 

बारामती - या उक्तीप्रमाणे तुकाराम...तुकाराम...तुकारामचा... जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवून जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मजल-दरमजल करत गुरुवारी अवघड चढणीचा रोटीघाट पार करून बारामती तालुक्यात दाखल झाला. आषाढ मासातील मेघांच्या छत्रछायेखाली पंढरीच्या वाटेवरील वारकरी मंडळींनी अवघड चढणीचा घाट झपाझप पावले टाकत पार केला. विठ्ठल दर्शनाच्या आशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर मध्येच फुगडीच्या खेळात रंगून वारकरी श्रमपरिहार करत होते. पालखी ओढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या आणखी चार बैलजोड्या जुंपल्या. 

 

बुधवारी वरवंड (ता.दौंड) येथील मुक्काम आटोपल्यानंतर दुपारची रोटी गावातील विश्रांती घेऊन उंडवडी सुपे (ता.बारातमी) गावातील मुक्कामी मार्गस्थ झाली. बारामती तालुक्याच्या सीमेवर पालखीचे आगमन होताच प्रशासन व राजकीय पदाधिकारी मंडळींनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. शुक्रवारी पालखी बारामती मुक्कामी आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...