आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकोबांंच्‍या पालखीचा पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्ग्‍यात, हिंदु-मुस्लिम ऐक्‍याच अजोड प्रतिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या ओळी प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात त्या वारीत. जात, धर्म, परंपरा यांच्या पलिकडे गेलेला पालखी सोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो. म्हणूनच गेल्या तीनशे वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर तिचा पहिला विसावा होतो तो अनगडशाह बाबा दर्ग्यात. यादरम्‍यान दर्ग्‍यात पालखीची पूजा केली जाते. आज शुक्रवारी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास पालखीने या दर्ग्‍यात विसावा घेतला नंतर पालखीची पुजाही करण्‍यात आली. त्यानंतर पालखी पुढे पिंपरी चिंचवड कडे मार्गस्थ झाली. 

 

तुकाराम महाराज आणि अनगडशाह या दोन संतांच्या भेटीच प्रतिक म्हणून आजही याकडे पाहिले जाते. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी अनेक हिंदू-मुस्लिम भाविक या ठिकाणी येतात. 

 

वारी मार्गात जाती-धर्मातल्या कलहांना छेद देणारे अनेक प्रसंग पहायला मिळतात. पालखीचा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यातील विसावा हा प्रसंगही सामाजिक एकतेसह धर्माच्या पलिकडे असलेल्या भक्तीचा प्रत्यय देतो. 

 

काय आहे इतिहास?

अनगडशाह बाबा हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगदगुरू तुकाराम महाराजांची विठ्ठल माउली प्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि महाराजांचा दानशुरपणा यामुळ या मुस्लीम संतान जगद्गुरू तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे. आणि हेच हिंदू मुस्लीम ऐक्याच आणि सर्व भावनांच्या पलिकडे जाणार आध्यात्म. त्यामुळच आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पहिला विसावा घेतला जातो तो अनगडशाह बाबा दर्ग्यात. या ऐक्याच आणखी एक प्रतीक म्हणजे या दर्ग्याचे पुजाऱ्याचा मान मुसुगडे कुटुंबाकडे आहे. त्यांची तिसरी पीडी अहोरात्र बाबांची सेवा करते.


आज स्‍वार्थासाठी अनेकजण जाती-जातीमध्ये विष कालविण्याचे उद्योग करतात. मात्र साडे तीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळ्यात हे विष निकामी ठरते आहे. त्यामुळेच या वारी सोहळ्यातून प्रेम, आदर आणि ऐक्य हे आदर्श प्रत्‍येकांनी घ्‍यावी हीच विठ्ठला कडून अपेक्षा. 

 

पालखी पिंपरी चिंचवडमध्‍ये

पिंपरी चिंचवड शहरात अर्थात उद्योग नगरीत आज सायंकाळी संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचे संध्‍याकाळी 5च्‍या सुमारास आगमन झाले. पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठलरुख्मीनी मंदीरात असणार आहे. निगडी आकुर्डीतील नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. विविध संस्थांनी वारकऱ्यासाठी पाणी, अन्न, फळांचे वाटप केले.

 

संत तुकाराम महाराजांचे देहूतील इनामदारवाड्यातून आज प्रस्थान झाले. देहूरोड येथून पालखी निगडीच्या दिशेने मार्गस्त झाली आणि पिंपरी चिंचवड अर्थात उद्योग नगरीत सायंकाळी पालखीचे निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने करण्यात पालखीचे स्वागत करण्यात आले. दिंडी प्रमुखांना लोकप्रतिनिधींकडून  ताडफत्री भेट देण्यात आली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...