आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- पंढरपूर मार्गावर निरा- वाल्हे दरम्यान 2 कारचा अपघात, डॉक्टरसह दोघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे - पंढरपूर या आषाढीनिमित्त सध्या सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या पालखी मार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. नीरा-वाल्हेदरम्यान दोन कारमध्ये झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. 

 

डॉ. सत्यम लोगाडा (43, रा, लोणंद) आणि वाहनचालक आनंद गणपत चांडुली (40, वेळापूर, ता. माळशिरस, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणंद येथील रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. 

 

रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास एक स्विफ्ट आणि अन्य कार या मार्गाने जात होत्या. दोन्ही कार वेगाने जात असताना अचानक एकमेकांवर अादळल्या. दरम्यान, एका कारमध्ये असलेल्या एअरबॅग्ज उघडल्याने त्यात पुढे बसलेल्या व्यक्तींना जास्त दुखापत झाली नाही तसेच दोन लहान मुले बाहेर फेकली गेल्याने बचावली, अशी माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक अंकुश माने यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...