आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lonavala: कचरा डेपोमधील कुत्रीम तलावात घसरून दोन मुलांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेळायला गेलेल्या दोन मुलांचा कुत्रीम तलावात घसरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे आठच्या सुमारास लोणावळ्याच्या वरसोली टोल नाक्याजवळ घडली. सोनु रफिक शेख (१४) आणि अस्लम मुजावर शेख (१६) अशी मृत मुलांची नावे आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास लोणावळ्यातील 
कचरा डेपो येथे बांधकाम सुरू असलेल्या परिसरात सोनू आणि अस्लम खेळण्यासाठी गेले होते. त्यादरम्‍यान खेळता खेळता ते कृत्रिम तलावात पडले. बाहेर निघण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न केले, मात्र तलावातील कठडे निसरडे असल्या कारणाने त्यांना वर येता आले नाही. शेवटी बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाला. 


घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी लोणावळा शहर पोलीस तसेच शोध कार्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल झाले होते. शिवदुर्गच्या जवानांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मुलांचे आई वडील कचरा विघटन प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या जागेत राहतात. या घटनेमुळे कचरावेचक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...