आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची नजर चुकवून दोन वर्षांच्या मुलीचा विनयभंग, 21 वर्षीय तरुणाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरीतील रहाटणी फाटा परिसरात एका दोन वर्षीय मुलीचा 21 वर्षीय युवकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी फाटा परिसरातील एका घराच्या अंगणात काल दुपारी दो वर्षांची मुलगी खेळत होती. त्यावेळी भैय्यासाहेब फंदे (21) हा तरुणे तिथे आला. तो त्याने मुलीला आपल्या जवळ घेतले व आईची नजर चुकवून त्याने बालिकेचा विनयभंग केला. आईची नजर जाताच याविषयी जाब विचारताच त्याने तिथून पळ काढला. नंतर एका 32 वर्षीय इसमाने त्याची तक्रार वाकड पोलिसांत केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. वाकड पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...