आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune: अर्ध्या रात्री चालकास चाकूचा धाक दाखवून उबेर कार लंपास, गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरीत उबेर कार चालकाला चाकूचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कार घेऊन धूम ठोकली. ही घटना बुधवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ दिलीप देशमुख (वय 23, रा. हडपसर) याच्या तक्रारीवरुन अज्ञात तीन चोरट्यांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ उबेर कार चालवतो. महिला प्रवाशांनी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास भूमकर चौकातून सौरभची कार बूक केली. सौरभने महिला प्रवाशांना पिंपरीमधील स्वप्ननगरी वसाहतीजवळ सोडले. त्यानंतर तो कार वळवून जात असताना अज्ञात तीन तरुणांनी त्याला अडविले. एकाने चाकूचा धाक दाखवला तर एकाने सौभरला कारच्या खाली ओढले व कारचा ताबा घेतला. दोघेजण कार घेऊन पसार झाले तर एकजण दुचाकीवरून गेला. 

बातम्या आणखी आहेत...