आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी करण्यासारखे मंदिर सोपे नाही, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राम मंदिर उभारणे नोटबंदीच्या निर्णयाइतके सोपे नाही. वर्षानुवर्षे जो प्रश्न वादग्रस्त आहे त्यावर असा तडकाफडकी निर्णय सोपा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच २०१९ मध्ये राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करणार असल्याचे कथित वक्तव्य केल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत विचारल्यावर उद्धव यांनी ही प्रतिक्रिया दिली.


शनिवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने उद्धव पुण्यात होते. महाविद्यालयांत गीतावाटप करण्यापेक्षा विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागतील इकडे लक्ष द्या, अशी टीका त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर केली.

 

शहा यांच्या वक्तव्याचे भाजपकडून खंडन
२०१९ निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारले जाईल, या अमित शहांच्या कथित वक्तव्याचे भाजपने खंडन केले आहे. निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारणीतील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू, असे अमित शहा हैदराबाद दौऱ्यात म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...