आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बारामतीत, पवारांच्या घरी घेतले स्नेहभोजन; पाहा PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज बारामती दौ-यावर आहेत. बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना त्यांनी भेटी दिल्या व कृषी क्षेत्रातील बदल व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते. 

 

यानंतर नायडू यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजमधील शरद पवार यांच्या वस्तुसंग्राहलयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यानंतर दुपारी नायडू यांनी शरद पवारांच्या माळेगाव येथील घरी सहकुटुंबासह भोजन घेतले. 

 

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजता नायडू यांचे बारामतीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी केले. थोड्याच वेळात विशेष विमानाने नायडू पुण्याकडे रवाना होतील. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे बारामती दौ-यातील क्षणचित्रे....

बातम्या आणखी आहेत...