आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रकने अचानक घेतला पेट, सुदैवाने चालक बचावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणावळा- मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने लोणावळा परिसरात अचानक पेट घेतल्‍याची घटना आज सकाळी 7 वाजेच्‍या सुमारास घडली. प्रसंगावधान राखल्‍याने चालकाचा जीव बालंबाल बचावला आहे. ट्रक मध्ये केमिकल, प्लास्टिक आणि बांधकाम साहित्य असल्यामुळे आग आणखी भडकली. यामुळे ट्रक जळून खाक झाला आहे.

 

भर रस्त्यात जळत असलेल्या ट्रक मुले काही काळ पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच देवदूत टीम, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ ट्रकला रस्त्याच्या कडेला हटविण्यात आले. अद्याप आग लागल्याचे कारण अस्पष्ट आहे.

 

बातम्या आणखी आहेत...