आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्यूं पाटील और लढोगे....\' \'क्यूं नही, बचेंगे तो और भी लढेंगे....!\' वाचा, वीर मराठा सेनानीबाबत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूरवीर मराठा सेनानी दत्ताजी शिंदे.... - Divya Marathi
शूरवीर मराठा सेनानी दत्ताजी शिंदे....

पुणे- वीर मराठा सेनानी दत्‍ताजी शिंदे यांचा पानिपतच्‍या लढाईमध्‍ये अब्दालीच्‍या सैन्‍यांनी 10 जानेवारी 1731 रोजी शिरच्‍छेद केला होता. या युद्धात नजीब खानने दत्ताजी यांना ठार मारण्याआधी विचारले की, 'क्यूँ पाटील लढोगे?' त्यावर दत्ताजी यांनी 'क्यूँ नही, बचेंगे तो और भी लढेंगे' हे अजरामर उत्तर दिले होते. आता या घटनेला 287 वर्षे पूर्ण होताहेत. त्‍या अनुषंगाने आज आम्ही दत्‍ताजी शिंदे यांच्या शौर्याचा धांडोळा घेत आहोत. अखेरचे शब्‍द झाले अजरामर......

 

- दत्‍ताजींच्‍या तुकडीला अफगाणी रोहिल्‍यांनी घेरले. मराठ्यांच्‍या काहीच सैनिकांकडे बंदुकी होत्‍या. या उलट प्रत्‍येक रोहिल्‍यांकडे तोफ आणि बंदुकी होत्‍या.
- त्‍यामुळे मराठे त्‍यांच्‍यापुढे हतबल झाले. मात्र, हार मानणार ते मराठे कसले. निधड्या धातीवर गोळ्या झेलत मराठे पुढे-पुढेच जात होते. यात दत्‍ताजी सुद्धा आघाडीवर होते. 
- दरम्‍यान, कुतुबशहाने त्यांच्यावर बंदूक रोखली. तरीही दत्‍ताजी तलावर घेऊन त्‍याच्‍यावर चाल करून गेले. मात्र, त्‍याने त्‍यांच्‍यावर गोळी झाडली. 
- दत्‍ताजी धारातिर्थी पडले. कुतुबशहा त्‍यांना म्हणाला, "क्यूं पाटील और लढोगेऽऽऽ?" दत्‍ताजींनी आपला क्षीण होत चाललेला आवाज एकवटला आणि वाघाने डरकाळी फोडावी तसे उद्गारले, "क्यूं नही? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!" त्‍यांचे हेच शब्‍द संपूर्ण भारतीय अपखंडात आज अजरामर झाले.

 

पुढे स्‍लाईड्सवर वाचा, मराठ्यांनी लपवून ठेवले होते दत्‍ताजींचे धड...

बातम्या आणखी आहेत...