आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE- नाझरे धरणात नैसर्गिक चमत्कार, पाणी चक्राकार गतीने ढगात गेल्याचा व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जिल्ह्यातील पश्चिम भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. पुरंदर तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. मात्र यादरम्यान जेजुराजवळील नाझरे धरणात निसर्गाच्या चमत्काराचा प्रत्यय आला. धरणातील पाणी चक्राकार गतीने आकाशात झेपावल्याचा चमत्कार अनेकांना शुक्रवारी सायंकाळी पहायला मिळाला. ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात कैद केली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नाझरे धरण परिसरात काल जोरदार पाऊस झाला यादरम्यान विजाही चमकत होत्या. अचानक वीज पडल्याचा आवाज स्थानिक नागरिकांना आला. त्यामुळे लोकांचे लक्ष धरणाकडे गेले तर धरणातील पाणी चक्राकार गतीने आकाशात उंचपर्यंत उडताना दिसत होते. हा प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. धरणाच्या पाण्यावर हवेचा दाब अचानक कमी झाल्याने त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली.

 

पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ.....

 

बातम्या आणखी आहेत...