आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार सुप्रिया सुळे जेव्हा चिखलाचे बीजगोळे बनवतात, वाचा काय आहे ही भानगड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेल्या बीजगोळे उपक्रमात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे..... - Divya Marathi
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेल्या बीजगोळे उपक्रमात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे.....

पुणे- पुण्यातील नांदेड सिटी.... देशातील सर्वांत मोठी टाऊनशीप. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त (22 एप्रिल) रविवारी 'भवताल' आणि 'सेप'च्या वतीने तेथे बीजगोळे तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. नांदेड सिटीचा भाग मोडतो बारामती लोकसभा मतदारसंघात. त्यामुले या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आणि त्या आनंदाने सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत स्थानिक महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, तरूण मंडळी अशा सर्वांनीच माती-शेणाचे बीजगोळे तयार केले.

 

सुप्रियाताई स्वत:च सहभागी झाल्या. मग काय? त्यांच्यासोबत आलेले कडक कपड्यातले सर्व कार्यकर्तेसुद्धा मांडी घालून खाली बसले आणि मातीत हात घालून गोळे बनवू लागले. हा प्रसंग बरंच काही सांगणारा होता. एखाद्या कामात नेत्यालाच सहभागी करून घेतलं की काम सोपं होतं, ते असं.


लहान मुलांनी खरी धमाल केली. इतर लोक आले गेले, तरी त्यांचं बीजगोळे बनवणं मनापासून सुरूच होता. त्यांच्यावर अप्रत्यक्ष संस्कार हाच तर या उपक्रमाचा उद्देश आहे. 

 

या उपक्रमात 'पवार पब्लिक चँरिटेबल ट्रस्ट', नांदेड सिटीच्या 'पीपल मेंटेनन्स सर्व्हिस' (पीएमएस) विभागाचं मोठं सहकार्य झालं. अगदीच थोडक्या कालावधीत त्यांनी उपक्रमाचं आयोजन केलं. नांदेड सिटीचे एक संचालक नरसिंग लगड यांनीही सहभाग नोंदवला. यात 'भवताल'चे अभिजीत घोरपडे व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या उपक्रमात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळेंचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...