आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओशो आश्रमात टॉयलेट साफ करायचे विनोद खन्ना; लोक म्हणायचे 'सेक्सी संन्यासी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दर्शनशास्त्राचे प्राध्यापक आणि आध्यात्मिक गुरू असलेले ओशो रजनीश यांचा आज (11 डिसेंबर) जन्मदिवस. समाजवाद, धार्मिक व्यवस्था, सामाजिक चालीरीती आणि चालू धर्मकारणावरील प्रखर टीकेमुळे सतत वादग्रस्त राहिले. ते नेहमीच स्थळ आणि वेळेच्या पलीकडे राहिले.

 

1960 च्या दशकात ते आचार्य रजनीश, 1970 आणि 80 च्या दशकात भगवान श्री रजनीश आणि 1989 नंतर ते ओशो या नावाने प्रसिद्ध झाले. 1970 मध्ये ते काही काळासाठी मुंबईत राहिले. 1974 पासून पुण्यात राहिले आणि तेथे त्यांनी एक आर्शम स्थापन केला. या आर्शमाकडे परदेशी नागरिक मोठय़ा संख्येने आकर्षित झाले.

 

या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांच्याविषयी रोचक माहिती घेऊन आलो आहे. 1946 मध्ये पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद खन्नांचे कॅन्सरच्या आजाराने यावर्षीच एप्रिल 2017 महिन्यात निधन झाले होते.

 

पुण्यातील ओशो आश्रमात विनोद खन्ना अनेक दिवस राहिले होते. येथे ते आचार्य रजनीश ओशोसमवेत अमेरिका गेले. तेथे त्यांनी आश्रमात राहताना टॉयलेटपासून भांडी धुण्याचे काम केले होते.

 

लोक म्हणायचे 'सेक्सी संन्यासी'...

- पुणयातील ओशो आश्रमता विनोद खन्नाला औपचारिकरित्या 31 डिसेंबर, 1975 रोजी दीक्षा दिली होती.
- ओशो आश्रमात येण्यापूर्वी विनोद खन्नांची ओळख बॉलिवूडमधील पहिल्या तीन यशस्वी अभिनेता अशी होती.
- ओशोशी जोडले जाताच त्यांनी शेकडो बूटाचे जोड, सूट, कपडे आणि इतर लग्झरी वस्तू लोकांना वाटून टाकल्या.
- यानंतर ते आधी गेरुआ आणि नंतर आश्रम द्वारा निर्धारित भगवी वस्त्रे घालू लागले.

 

ओशो आश्रमात माळी काम करायचे विनोद खन्ना-
- विनोद खन्ना, आचार्य रजनीश ओशोसह अमेरिकेतील ओरेगानमध्ये कम्यून स्थापन करण्यासाठी गेले.
- तेथे त्यांना ओशो यांनी आपल्या पर्सनल गार्डनची देखभाल करण्यासाठी माळी म्हणून नियुक्त केले होते.
- तेथे ते सुमारे चार वर्षे राहिले. अमेरिकन प्रशासनाने ओशोंचा आश्रम बंद केल्यानंतर ते भारतात परतले.
- एका इंटरव्यूमध्ये विनोद खन्नांनी कबुल केले होते की, अमेरिकेतील ओशो आश्रमात ते अनेक काळ माळी काम करायचे. एवढेच नव्हे तर आश्रमात टॉयलेट साफ करण्यापासून भांडी धुण्यापर्यंतची कामे केली.
- जेव्हा विनोद खन्नांनी फिल्‍ममधून संन्यास घेण्याची घोषणा केली तेव्हा लोकांचा विश्वासच बसत नव्हता. लोक त्यांना त्यावेळी 'सेक्‍सी संन्‍यासी' म्हणून लागले होते.

 

पत्नीसोबतचे तुटले नाते-
- 4-5 वर्षे कुटुंबियांपासून दूर राहिलेल्या विनोदचे कौटुंबिक आयुष्य उद्धवस्त झाले होते.
- जेव्हा विनोद खन्ना भारतात परतले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
- कुटुंब उघड्यावर आल्यानंतर 1987 मध्ये विनोद यांनी फिल्म 'इन्साफ' द्वारे बॉलिवूडमध्ये पुन्हा एंट्री केली.
- फिल्मी करियर पुन्हा सुरु केल्यानंतर विनोद यांनी 1990 मध्ये कवितासोबत लग्न केले.
- कवितापासून विनोद यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. विनोदचा साक्षी हा मुलगा फिल्ममध्ये येण्याची तयारी करत आहे.
- विनोद यांन पहिल्या पत्नीपासून राहुल आणि अक्षय खन्ना ही मुले आहेत. दोघेही बॉलिवूडमध्ये राहिले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... विनोद खन्ना संन्यासी बनले त्या काळातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...