आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, 27 वर्षीय महिलेची तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड - 27 वर्षीय महिलेशी विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर चाकण येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चाकण येथे ही घटना घडली. स्‍वीकृत नगरसेवकाच्‍या पत्‍नीने त्‍यांच्‍याविरोधात तक्रार दिली आहे. नगरसेवक आणि आमदार मोहिते-पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. त्‍यावरुनच हा प्रकार घडल्‍याची चर्चा परिसरात सुरू आहे.

 

हात धरत केली दमबाजी, महिलेचा आरोप

चाकण मधील स्वीकृत नगरसेवक आणि दिलीप मोहिते-पाटील यांच्या गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. बुधवारी आठ वाजेच्या सुमारास दिलीप मोहिते-पाटील स्वीकृत नगरसेवक यांच्या मार्केटयार्ड येथील दुकानात गेले होते. मात्र त्या ठिकाणी नगरसेवक उपस्थित नव्हते. तिथे उपस्थित असलेल्‍या नगरसेवकाच्‍या पत्‍नीशी (27), दिलीप मोहिते-पाटील यांनी वाद घातला. मोहिते-पाटलांनी आपला हात धरुन दमबाजी केली. तसेच 'तुझ्या नगरसेवक पतीने हत्‍या केलेल्‍या आहेत, त्‍याला नीट रहायला सांग', असे म्‍हणत शिवीगाळ केली, असा आरोप नगरसेवकाच्‍या पत्‍नीने केला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांत महिलेने दिलिप मोहिते-पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.


त्‍याच रात्री नगरसेवकावरही अपहरणाचा गुन्‍हा
आमदार मोहिते-पाटील यांच्‍याविरोधात तक्रार देताच त्याच रात्री तक्रारदार महिलेचे पती म्हणजेच स्वीकृत नगरसेवक यांच्यावर देखील अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एक महिलेने नगसेवकाविरोधात ही तक्रार दिली आहे. यावरुन ही महिला मोहिते-पाटील यांच्या गटातील असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. मात्र यामुळे चाकण परिसरात तणावाचे वातावरण असल्‍याचे प्रतिनिधीने सांगितले आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...