आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैसर्गिक संबंधासाठी पतीची जबरदस्ती, पुण्यात विदेशी महिलेने दाखल केली तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पतीविरोधात विदेशी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनसैर्गिक शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करण्याबरोबरच पती आपल्याला मारहाण आणि शिवीगाळही करतो, असा आरोप कल्याणी नगर येथे राहणाऱ्या इराणी महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.


तक्रारदार महिला मूळची इराण येथील       असून, तिचा पती ऑस्ट्रेलियन व्यावसायिक आहे. सध्या हे दोघे पुण्यात कल्याणी नगरमध्ये राहत आहेत. महिलेने केलेल्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


सविस्तर माहिती अशी की, २०१३ साली एका कॉमन मित्राच्या माध्यमातून तिची पतीशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर जुलै २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. डिसेंबर २०१७ पर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. परंतु, त्यानंतर नवऱ्याने आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केली. नवरा मध्यरात्री केव्हाही उठवून अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती करु लागला. जर मी त्याची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला, तर मला शिवीगाळ करूण मारहाण करायचा, असे महिलेने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...