आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या स्मृतीप्रीत्यर्थ महिला चित्रपट महाेत्सव; पुणे शहरात 9 मार्चपासून तीनदिवसीय आयोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रसिद्ध दिवंगत चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयमध्ये ९ मार्चपासून तीनदिवसीय महिला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.


एनएफएआय तर्फे आयोजित या महोत्सवात बॉलीवूडमधील चांदनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. या महोत्सवात श्रीदेवी आणि कमल हसन अभिनीत मूंद्रम पिराई हा तामिळ चित्रपट दाखवला जाईल. बालू महेंद्र यांच्या या चित्रपटात श्रीदेवीने उत्कृष्ट अभिनय केला होता. श्रीदेवी यांनी या चित्रपटात स्मृतीभ्रंश झालेल्या महिलेचा अभिनय केला होता.  ‘सदमा’ हा या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.अशा प्रकारचा हा ९ वा चित्रपट महोत्सव  आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित या महोत्सवाचा विषय महिला प्रवासी असा आहे. ९ मार्च रोजी सिडनी पोलक यांचा ‘आउट ऑफ अफ्रिका’ चित्रपट सादर केला जाईल. या महोत्सवात  ब्लॉगर रितु हरिष गोयल यांना सन्मानित केले जाईल. 

बातम्या आणखी आहेत...