आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवप्रेमीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू, दोन गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवनेरी किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या एका शिवप्रेमीचा अपघातात मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले.ही घटना सोमवारी रात्री चाकणजवळ घडली. स्वप्नील चव्हाण असे मृत्यू झालेल्या शिवप्रेमीचे नाव आहे. अमर पाचपुते आणि विनायक चव्हाण अशी जखमींची नावे आहेत. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे सोमवारच्या रात्री हा अपघात झाला. शिवनेरी येथून वाई येथील पाचपुतेवाडी येथे शिवजयंती उत्सवासाठी ही शिवज्योत घेऊन हे शिवप्रेमी निघाले होते. तेव्हा चाकण येथे शिवज्योत मध्ये तेल घालण्यासाठी एक दुचाकी घेऊन स्वप्नील, अमर आणि विनायक थांबले. मागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला तर अमर आणि विनायक गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलिस करीत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...